गुंड बंडू आंदेकरच्या वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या नातवाच्या घरात झडती घेत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वकिलांविरुद्ध समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तेथून दोन पिस्तुलांसह, चांदीचे दागिने, रोकड, तसेच कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रफुल्ल चव्हाण यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोथरूड भागात टेकडीवर आग – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे, अमोल आवाड हे नाना पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी आंदेकर टोळीतील तन्मय गणेश कांबळे (रा. राजेवाडी, नाना पेठ) याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कांबळेला ताब्यात घेतले. तेव्हा कांबळेने एका अल्पवयीनाकडे पिस्तूल ठेवायला दिल्याची माहिती मिळाली.

पोलिसांचे पथक नाना पेठेतील डोके तालीम परिसरात गेले. डोके तालमीजवळ असलेल्या चार मजली इमारतीत आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर राहायला आहेत. तिची मुलगा स्वराज वाडेकर याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली. पोलिसांनी तेथून दोन पिस्तुले, एक एअर गन, १७ लाख १५ हजार २६० रुपये, १८ लाख ८४ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल जप्त केला. वाडेकर याच्या इमारतीतील भाडेकरु प्रभू मारुती लोकरे याच्या घराची झडती घेण्यात आली. पोलिसांनी ई-साक्ष ॲ्रपद्वारे चित्रीकरण केले. त्यावेळी दोन वकील तेथे आले. ‘बंडू आंदेकर आमचे अशील आहेत. तुम्ही महिलेच्या घराचे कुलूप तोडू आत शिरले’, असे वकिलांनी त्यांना सांगितले. त्यावेळी खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप तेथे हाेत्या. ‘आमची कारवाई कायदेशीर असून, पोलिसांना काम करु द्या’, असे पोलीस निरीक्षक जगताप यांनी वकिलांना सांगितले. त्यानंतर वकिलांनी त्यांच्याकडे घरझडतीची परवानगी आहे का ? अशी विचार करुन अरेरावी केली, तसेच सरकारी कामात अडथळा आणला, असे पोलीस हवालदार प्रफुल्ल चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×