कोथरूड भागात टेकडीवर आग

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

marathinews24.com

पुणे – कोथरूड भागातील परमहंसनगर परिसरात टेकडीवरील गवाताला आग लागल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. पौड रस्त्यावरील परमहंसनगर परिसरात टेकडीवर वणवा पेटल्याची माहिती अग्निशमन दलाच्या केंद्राला बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास मिळाली होती.

भरधाव दुचाकी कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळली – सविस्तर बातमी

चांदणी चौकातील एनडीए अग्निशमन केंद्रातील अधिकारी सुनील नामे, शरद गोडसे, विजय स्वामी, धीरज साळुंखे, आशिष सुतार, शिवाजी कोंढरे यांनी तेथे धाव घेतली. टेकडीवर आग लागल्याने जवानांनी पायथ्यापासून पाईप (होजरिल) टेकडीवर नेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी लष्कराच्या ‘एआरडीई’ संस्थेतील अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत केली. जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यानी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×