भरधाव दुचाकी कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळली

भरधाव कंटेनरची धडक; अज्ञात पादचाऱ्याचा मृत्यू

डेक्कन येथील दुर्घटना; दोन तरुण जखमी

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकी कठडा तोडून भुयारी मार्गात कोसळल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. अपघातात दुचाकी स्वारासह सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तन्मय संदीप राऊत (वय २३, रा. श्री रेसीडन्सी, उत्तमनगर), महेश अनंता इंगळे (वय २८, रा. इंगळे हाईट्स, उत्तमनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई जगदीश हिरेमठ यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरीत प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय आणि महेश हे खासगी ठिकाणी नोकरी करतात. बुधवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास दोघे जण जंगली महाराज रस्त्यावरुन भरधाव वेगात डेक्कन जिमखान्याकडे निघाले. गरवारे भुयारी मार्गावर तीव्र वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी लोखंडी कठड्यावर आदळली. कठडा तोडून दुचाकीसह तन्मय आणि महेश हे भुयारी मार्गात कोसळली.

अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. नागरिकांनी तेथे धाव घेतली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. पोलीस शिपाई जगदीश हिरेमठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×