पुण्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

पुन्हा कोयते…कुठेयत बंदुकधारी

marathinews24.com

पुणे – शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गाजावाजा करणार्‍या पुणे पोलिसांवर दुचाकीस्वार चोरटे, घरफोडी करणारे, कोयता गँग सातत्याने वरचढ ठरत आहे. दिवसेंदिवस घडणार्‍या घटनांमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. असे असताना डेक्कनमध्ये कोयताधार टोळक्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडा टाकला आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी बाजीराव रस्त्यावरील कोयताधारी टोळक्याने अल्पवयीन मुलावर सपासप वार करून संपवले होते. तसेच कोयताधार्‍यांनी दिवसाढवळ्या खूनातील आरोपीच्या भावावर कोयत्याने हल्ला चढवून बदला घेतल्याचीही घटना ताजी आहे. अशा घटनांमुळे पुणे खरंच सुरक्षितत राहिले आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

दरोड्याच्या तयारीतील सराईतांना अटक; बंडगार्डन पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी

शहरात काही दिवसांपुर्वी शांत झालेली कोयता गँग पुन्हा एका अ‍ॅक्टीव झाल्याचे दिसून आले आहे. येरवडा, गोखलेनगर परिसरातील वडारवाडीत टोळक्याने कोयत्याच्या धाकाने वाहनांची तोडफोड केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारून टोळीला अटकही केली. त्यामुळे कोयताधार्‍यामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली होती. मात्र, मध्यवर्ती डेक्कन परिसरताील बारवर कोयताधारी टोळक्याने दरोडा टाकून डोके वर काढले आहे. एकीकडे दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस कायम आहे. तर वाहन चोरीसह इतर सुरक्षिततेचे तीनतेरा झाले आहेत. पीएमपीएल बसमध्ये प्रवाशांच्या ऐवजांवर डल्ला मारणार्‍या टोळ्या आणि सायबर चोरट्यांनी पुणेकरांना अक्षरशः वेठीस धरले आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून पुणेकरांना कोट्यावधींचा गंडा घातला आहे.

बहुतांश पोलिसांचे ग्राउंडवर उतरून पोलिसिंगचे प्रमाण कमी झाल्यामुळे लुटमार, चोर्‍या, चेनस्नॅचिंगचा आलेख उंचावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहेत. त्यातच अल्पवयीन कोतयाधारी टोळक्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कधी घोळका धावत कोणाचा पाठलाग करून कोयत्याने सपासप वार करेल, याचा नेम राहिला नाही. राग, खुन्नस, पूर्ववैमनस्यातून थेट कोयता आणि घातक शस्त्राद्वारे केली जाणारी मारहाण पोलिसांचा वचक कमी करणारी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा वनराजच्या खूनानंतर पुण्यात गँगवार भडकले असून, दिवसाढवळ्या गोळीबार, कोयत्याच्या वाराने सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

गुंड गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर, वनराजच्या हत्येतील आरोपीचा भाउ गणेश काळे, मयंक खरारे या अल्पवयीनाचा अत्यंत वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर कोयत्याने हल्ला करीत खून केला. घातक कोयत्यांच्या विक्रीला बंदी असतानाही बिनधिक्कपणे विकले जाणारे कोयते, अल्पवयीनांमध्ये सुरू असलेल्या भाईगिरीची क्रेझ थेट खूनापर्यंत येउन पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यातील गुन्हेगारीबद्दल खडानखडा माहिती असणारे अधिकारी सक्रिय असूनही उपयोग काय असा प्रश्न निर्माण केला जात आहे. पोलीस दलातील शिथिलतेमुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे का, पोलीस यंत्रणा बोथट झाल्याने कोयत्याचा वापर गुन्हेगारीसाठी होऊ लागला का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. कोयताधारींच्या धुडगूसामुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीला लागणारा बट्टा पुसून काढण्यासाठी ठोस अमलबजावणीची आवश्यकता आहे. त्यासाठी शस्त्रधारीविरूद्ध पैâसला ऑन दि स्पॉट अशीच तयारीही पोलिसांना करावी लागणार आहे.

कोयताधारींचा असाही ट्रेंड

पुण्यात मागील काही दिवसांत बहुतांश झालेले खून कोयत्याच्या हल्ल्याने केले आहेत. जेणेकरून टोळीची दहशत, दादागिरी निर्माण करण्यासाठी हल्लेखोर कोयत्याचा वापर करीत असल्याचे बोलले जाते. त्यासोबतच सोशल मीडियावर शस्त्रअस्त्राद्वारे आपली ताकद दाखवण्यासाठीही कोयताधारींचा ट्रेंड निर्माण होत आहे. प्रामुख्याने अल्पवयीन मुलांसह नुकतीच मिसरूड फुटलेली पोरंही आता अशा ट्रेंडकडे झुकत आहेत. पालकांचे दुर्लक्ष, संगती, प्रलोभन, आर्कषणापोटी अनेकजण गुन्हेगारीकडे अल्पवयातच वळत आहेत. त्यावर उपाय शोधून वेळीच आवर घालणे काळची गरज आहे. अन्यथा सोशल मीडियाच्या जमान्यात व्हायरलप्रमाणे गुन्हेगारीलाही धार चढण्यास वेळ लागणार नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×