Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Crime News : देवाची उरुळीत घरफोडी; रोकडीसह जमिनीचे खरेदीखत चोरीला

Crime News

अज्ञात व्यक्तीवर फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Crime News : देवाची उरुळी येथील घराचा सेफ्टी लॉक तोडून चोरट्याने १० हजार रुपयांची रोकड आणि गावाकडील जागेचे खरेदीखत चोरून नेले. घरातील कपाट व लॉकरचे लॉकही तोडण्यात आले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रमेश किसनराव धुमाळ (वय ४५, रा. सुलई कॉम्प्लेक्स, फ्लॅट क्रमांक १०, दुसरा मजला, महंमदवाडी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

कॅम्पमध्ये जेवणासाठी आलेल्या ५ जणांना मारहाण – सविस्तर बातमी    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेआठ वाजता देवाची उरुळी येथील सावली होमजवळील सावली सृष्टी, प्लॉट क्रमांक ६५ येथे ही घटना घडली. चोरट्याने एखाद्या साधनाच्या साहाय्याने घराच्या दरवाजाचा सेफ्टी लॉक तोडला आणि विनापरवानगी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे तसेच आतील लॉकरचे लॉक तोडून त्यातील रोकड घेतली. धुमाळ यांच्या गावाकडील जागेचे खरेदीखतही चोरून नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस अंमलदार हराळे तपास करीत आहेत.

औंधमध्ये तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार

Crime News : औंधमधील डी. पी. रोडवर अठरा वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी हत्याराने मारून त्याला जखमी करण्यात आले. एका आरोपीने हत्याराने हल्ला केला, तर दुसऱ्याने तरुणाला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी प्रज्वल ओम कांबळे (वय १९, रा. पीएमसी बिल्डिंग, नागरस रोड, औंध) आणि गुरुराज देविदास फंड (वय २२, रा. पीएमसी बिल्डिंग, मेडीपॉइंटसमोर, डी. पी. रोड, औंध) यांच्यावर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिद्धेश राजू गायकवाड (वय १८, रा. पीएमसी बिल्डिंग, डी. पी. रोड, औंध) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजून पाच मिनिटांनी अमेय अपार्टमेंटजवळ ही घटना घडली. गायकवाड यांना काही समजण्यापूर्वीच कांबळे याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी हत्याराने मारले. फंड याने त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पोलिस उपनिरीक्षक दबडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×