Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Crime News : कॅम्पमध्ये जेवणासाठी आलेल्या ५ जणांना मारहाण

Pune Crime News

बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : कॅम्पमधील न्यूक्लस मॉल चौपाटी येथे जेवणासाठी आलेल्या पाच जणांना दगड आणि लोखंडी हत्याराने मारहाण करून जखमी करण्यात आले. शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार आहे. याप्रकरणी अभिषेक सुनील अवघडे (वय २७), अमित सुनील अवघडे (वय ३०) आणि रोहन महादेव सोनावणे (वय ३७, सर्व रा. घोरपडी गाव, पुणे) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल सुभाष बाथम (वय ३८, रा. घर क्रमांक २१, घोरपडी बाजार, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

कात्रज भागात दोन फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर एक वाजून पाच मिनिटांनी ही घटना घडली. बाथम मित्रांसोबत जेवणासाठी आले होते.  त्या वेळी आरोपींनी त्यांच्यासह निखिल परदेशी, अविनाश परदेशी, राज बाथम आणि नितीन बाथम यांना मारहाण केली. हाताने, दगडाने व लोखंडी हत्याराने मारल्यामुळे ते जखमी झाले. विनाकारण हल्ला करून धमकाविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

कंपनीचा १४ लाखांची फसवणूक

Pune Crime News : सेल्समन म्हणून विश्वास संपादन करून कंपनीचा माल विक्रीसाठी नेणे, कमिशन व इलेक्ट्रिक साहित्याच्या नावाखाली पैसे घेणे आणि मोबदला न देणे, अशा प्रकारे १४ लाख ८१ हजार ८०१ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फरासखाना पोलिसांकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी नरेंद्र शंकर सावंत (वय अंदाजे ४५, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किसन अर्जुन करडक (वय ५९, रा. स्वप्ननगरी, बी-बिल्डिंग, प्लॉट क्रमांक ३, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ ऑक्टोबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत बुधवार पेठेतील मोरया इंटरप्रायझेस येथे ही घटना घडली. स्पॅनिश रेमेडीज इंक कंपनीचा विक्री प्रतिनिधी असल्याचे सांगून आरोपीने विश्वास संपादन केला. कंपनीचा १२ लाख ५४ हजार ७०१ रुपयांचा माल नेला. विक्रीचे कमिशन म्हणून एक लाख ४९ हजार १०० रुपये आणि वैयक्तिक कामासाठी ७८ हजार रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य व रोख घेतल्याचा आरोप आहे. वेळ नोंदीत दिलेली नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×