वानवडीतील घटना
marathinews24.com
पुणे – Crime News : सराफी पेढीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना वानवडीतील साळुंखे विहार रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सराफी पेढीचे मालक जगदीश सोनी (वय ५३, रा. रिगालो सोसायटी, बिशप स्कूलजवळ, उंड्री) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलीस छाप्यात कारवाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांची साळुंखे विहार रस्त्यावरील स्पेस काॅर्नर इमारतीत रतन ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री सराफी पेढीचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. पेढीतील शोकेसमध्ये ठेवलेले एक लाख ५३ हजार रुपयांचे दागिने चोरून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरटयांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे तपास करत आहेत.
कोंढव्यात फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज लंपास
Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ४६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. शोएब शेख (वय ३६, रा. साईबाबानगर, कोंढवा) यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख कुटुंबीय सोमवारी (७ जुलै ) दुपारी साडेबाराच्या सुमारास सदनिका बंद करुन बाहेर गेले होते. चोरट्यांनी शेख यांच्या सदनिकेचे कुलूप चोरट्यांनी आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून २ लाख ४६ हजारांचे सोन्याचे दाागिने लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.
आंबेगाव पठारमध्ये एकाच सोसायटीतील दोन फ्लॅट फोडले
Crime News : भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव पठार परिसरात एकाच सोसायटीतील दोन फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत गणेश आढाव (वय ४०, रा. जिजामाता चौक, आंबेगाव पठार ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी आढाव यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबविले, तसेच त्याच सोसायटीत राहणाऱ्या लक्ष्मी राठोड यांच्याच सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने लांबविले. चोरट्यांनी एकूण मिळून १ लाख १० हजारांचा ऐवज लांबविल्याचे आढाव यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.