विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – Crime News : पिस्तूलाचा धाक दाखवत लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक विदेशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज ऊर्फ सोन्या रविंद्र भवार (रा. भिमनगर, विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
मौजमजेसाठी उच्च शिक्षिताकडून दुचाकींची चोरी – सविस्तर बातमी
विश्रांतवाडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अंमलदार संपत भोसले यांना सराईत गुन्हेगार धानोरी रोडवर पिस्तुल घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली. परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना तो धमकावत आहे. मी विश्रांतवाडीचा भाई आहे, मला जो नडेल त्याला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याने परिसरात दहशत माजवली होती. यापक्ररणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपी राज भवार याला ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस अंमलदारांनी शिताफीने पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले.
सराईताकडून विदेशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडे आणखी चौकशी केली जात आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक महेश भोसले, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव, होना साबळे यांनी केली.