गावठी पिस्तूल बाळगणार्‍या गुन्हेगाराला अटक

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – बेकायदेशीर देशी गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस बाळगणार्‍याला गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. अतुल सुनील चव्हाण (वय २६ रा. आईमाता मदिराच्या पाठीमागे चिकण दुकानाजवळ, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनानुसार ‘स्वच्छता महोत्सवाचे आयोजन – सविस्तर बातमी

बिबवेवाडी पोलिसांचे तपास पथक २६ Dispatched हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव यांना बिबवेवनगरात एकजण कमरेला पिस्तूल खोचून उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेउन आरोपी अतुल सुनील चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजारांचे गावठी पिस्तूल, काडतुस जप्त केले. आरोपीविरूद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाच्या आदेशाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे, उपनिरीक्षक अमोल माने, अमोल भुवड, संजय गायकवाड, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, रक्षित काळे, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, संतोष बनसुडे, राहुल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×