वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे– काम आटोपून घरी निघालेल्या मजुराला लुटणाऱ्या सराइतांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी मजुराच्या खिशातून मोबाइल आणि रोकड हिसकावून नेली होती. पोलिसांनी पसर झालेल्या आरोपीचा शोध घेत गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, मोबाईल आणि रोकड जप्त केली. आदित्य राम वाघमारे (वय २३, रा. कोथरूड) आणि सत्येंद्र मिठाईलाल जयस्वाल (वय २०, रा, वारजे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रखवालदाराच्या डोक्यात गज मारून खुनी हल्ला; एरंडवणे भागातील घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मजूर १२ मे रोजी सायंकाळी काम संपवून घरी चालले होते. त्यावेळी सराईत आरोपींनी मजुराला बावधनला सोडतो, असे सांगून रिक्षात बसवून डुक्कर खिंडीजवळ नेले. तिथे लघुशंकेचा बहाणा करून त्याला लुटण्यात आले. विरोध करताच त्याला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेनंतर घाबरलेल्या मजुराने दुसऱ्या दिवशी ठेकेदाराच्या सांगण्यावरून वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रणजित मोहिते पोलीस कर्मचारी धनंजय देशमुख, विजय भुरूक, संभाजी दराडे, विक्रम खिल्लारी यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली.