Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

वाहनांवर ‘एचएसआरपी’बसविण्याकरीता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

वाहनांवर ‘एचएसआरपी’बसविण्याकरीता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरीता मुदतवाढ

marathinews24.com

पुणे – राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याकरीता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

अग्निशमन दलाकडून माऊलींच्या पालखीत दलाकडून जवान तैनात – सविस्तर बातमी 

वाहनांवर एचएसआरपी बसविण्याकरीता यापूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे काम अपेक्षित प्रमाणात न झाल्यामुळे यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, आता नागरिकांच्या मागणीप्रमाणे वाहनांना एचएसआरपी मुदतवाढ पुन्हा देण्यात आली आहे.

एका ठिकाणी किमान २५ किंवा २५ पेक्षा अधिक दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक मालकांनी एचएसआरपी बसविण्याकरीता अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण संस्थामध्ये संबंधित एजन्सीमार्फत कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता एचएसआरपी बसविण्यात येईल.

या बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरीता M/s FTA HSRP Solutions Pvt Ltd या संस्थेची उत्पादकाची निवड करण्यात आली आहे. वाहनचालकांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसविण्याकरीता ऑनलाईन अपॉइंटमेंटसाठी https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या संकेतस्थळावर भेट द्यावी. मोटार सायकल व ट्रॅक्टरकरीता दर ४५० रुपये. तीन चाकी वाहनांकरिता ५०० रुपये आणि सर्व प्रकारचे चारचाकी वाहनांकरिता ७४५ रुपये तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) इतका दर आकारला जात आहे. हे शुल्क हे ऑनलाईन स्वरुपातच भरावे लागणार आहे, असेही निकम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×