चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील डेक्कन जिमखाना भागात चोरट्यांनी उच्छाद मांडला. प्रभात रस्त्यावरील एका वस्त्रदालनातून रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली, तसेच चोरट्यांनी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका उपाहारगृहाचे कुलूप तोडून रोकड चाेरली. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Deccan Gymkhana Theft या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी
Deccan Gymkhana Theft पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात रस्ता परिसरात डाॅ. केतकर मार्गावर वस्त्रदालन आहे. चोरट्यांनी मध्यरात्री वस्त्रदालनाचे कुलूप तोडले. गल्ल्यातून ९९ हजार ६६० रुपयांची रोकड चोरुन नेली. विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका उपाहारगृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी प्रभात रस्ता, तसेच विदी महाविद्यालय रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.





















