Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

एरंडवणे भागातील बंगल्यातून ३ लाखांचे दागिने चोरीला

एरंडवणे भागातील बंगल्यातून ३ लाखांचे दागिने चोरीला

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – एरंडवणे भागातील बंगल्यातून चोरट्यांनी तीन लाख ३६ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातून स्पर्धा परीक्षा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचे अपहरण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा बंगला एरंडवणे भागातील गनगोटे पथ परिसरात आहे. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी तीन लाख ३६ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना नुकतीत घडली. ज्येष्ठ महिलेच्या बंगल्यात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे तपास करत आहेत.

डेक्कन भागात काॅफी शाॅपमध्ये चोरी

डेक्कन जिमखाना भागातील शिरोळे रस्त्यावर असलेल्या एका काॅफी शाॅपमधून चोरट्यांनी काॅफी मशीन, मायक्रोवेव्ह असा एक लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबत एका महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोळे रस्त्यावर तक्रारदार महिलेचे लिटिल बिन काॅफी शाॅप आहे. चोरट्यांनी ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री काॅफी शाॅपचे दरवाजा उचकटून काॅफी तयार करण्यासाठी लागणारे यंत्र, मायक्रोवेव्ह चोरुन नेले.

प्रभात रस्त्यावरील खासगी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीला

प्रभात रस्त्यावरील खासगी वसतिगृहातून (पीजी) ४० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरून नेला. याबाबत एका विद्यार्थ्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार १९ वर्षीय तरुण प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक चार येथील सदानंद पीजी वसतिगृहात राहायला आहे. चोरट्यांनी वसतिगृहात ठेवलेला तरुणाचा लॅपटाॅप चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×