Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळावा संपन्न

तृतीयपंथी नागरिकांसाठी शासकीय सेवा, योजना व नशामुक्ती जनजागृतीचा उपक्रम

marathinews24.com

पुणे – सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि चंदादेवी चारिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने देवदासी व पारलिंगी माता-भगिनींसाठी दीपावली स्नेह मेळाव्याचे मांगल्य कार्यालय, बुधवार पेठ, पुणे येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

भारतीय सशस्त्र सैन्यात अधिकारी पदासाठी पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी – सविस्तर बातमी

अध्यक्षीय भाषणात विशाल लोंढे यांनी तृतीयपंथी नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व समाज कल्याण विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. तृतीयपंथी नागरिकांनी शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नशामुक्त भारत अभियानानिमित्त उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.

अभिनय कुंभार (IRS) यांनी तृतीयपंथी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावावे, याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अभिनय कुंभार , प्रधान आयुक्त, आयकर विभाग, पुणे व हृषीकेश रावले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमास चंदादेवी चारिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथी नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे प्रमुख तसेच सुमारे २०० तृतीयपंथी नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे संजीव अग्रवाल यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

यावेळी कार्यक्रमाच्या औचित्याने विविध शासकीय विभागांमार्फत सेवा-सुविधांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, परिमंडल-ई रेशनिंग कार्यालय मार्फत शिधापत्रिका सेवा, उपजिल्हाधिकारी (महसूल) कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेची माहिती, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम नोंदणी तसेच भूसंपादन अधिकारी, नोडल ऑफिसर-४ मार्फत आधार अद्ययावत करण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

सुमारे २०० पारलिंगी माता-भगिनींनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×