‘मानहानी कायदा, प्रसारमाध्यम स्वातंत्र्याबाबत घटनात्मक दृष्टिकोन’

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये राष्ट्रीय कार्यशाळा

marathinews24.com

पुणे – भारती विद्यापीठच्या न्यू लॉ कॉलेज(एरंडवणे,पौड रस्ता च्या लीगल एड सेलच्यावतीने नुकतेच ‘मानहानी कायदा आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत घटनात्मक दृष्टिकोन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. ओक, सर्वोच्च न्यायालयातील ऍडव्होकेट सौरभ शर्मा तसेच माध्यम अभ्यासक प्रसाद अनिरुद्ध कुलकर्णी हे मान्यवर पॅनलमध्ये सहभागी झाले होते. भारत सरकारचे कायदेविषयक सल्लागार डॉ. अमर मुल्ला यांचीही उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचा सत्कार भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन – सविस्तर बातमी

कार्यक्रमादरम्यान ‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012 (POCSO)’ या कायद्यावरील सविस्तर भाष्य असलेले पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्ज्वला बेंडाळे आणि डॉ. अमर मुल्ला यांचे सहलेखन असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती ए. एस. ओक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात ‘भारतीय दंड संहिता’, ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ तथा ‘भारतीय साक्ष्य अधिनियम’ यांसारख्या अलीकडेच अधिनियमित केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांचा आढावा घेत सखोल विवेचन करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×