Breking News
स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबारघरफोडीप्रकरणी आरोपीला अटक, बंडगार्डन पोलिसांची कामगिरीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादनरिक्षावर झाड कोसळून प्रवाशी जेष्ठ महिला ठारनागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटीबद्ध – पोलीस आयुक्त अमितेश कुमारपुण्यात बेशिस्त वाहन चालकांवर एआय द्वारे कारवाईशिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनअण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभपर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५ ’चे १ जून रोजी आयोजनबँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली १२ लाखांचा गंडा

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या शिंगांचे नष्टीकरण

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या शिंगांचे नष्टीकरण

कात्रज प्राणी संग्रहालयातील हरिणांच्या गळालेल्या शिंगांचे नियमानुसार नष्टीकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रजमधील हरिणवर्गीय वन्यप्राण्यांच्या नैसर्गिकरीत्या गळून पडलेल्या शिंगांचे नियमानुसार मंगळवारी (दि. २७) नष्टीकरण करण्यात आले. ही कार्यवाही पुणे महानगरपालिकेच्या विनंतीवरून उपवनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यवाहीसाठी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, वनपाल रूपनवर (खेड शिवापूर), वनरक्षक गायकवाड, मंडल अधिकारी सचिन चव्हाण, संचालक डॉ. राजकुमार जाधव, नगरसेवक महेश कदम, मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे उपस्थित होते.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील वन्यप्राण्यांच्या शिंगांचे नष्टीकरण

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी तात्पुरता बंद – सविस्तर बातमी 

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सांबर, चितळ आणि भेकर हरिणवर्गीय प्रजातींच्या १७६ गळालेल्या शिंगांचे संकलन करण्यात आले होते. संबंधित शिंगांचे प्राणी संग्रहालयातील ज्वलनशील वायू आधारित दहिनीच्या मदतीने सुरक्षित आणि नियमानुसार नष्टीकरण केले. ही संपूर्ण प्रक्रिया रीतसर पंचनामा व व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे पारदर्शकपणे पार पाडली असून, त्याचे नोंदीकरण व आवश्यक दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. कार्यवाहीसाठी वनविभागाच्या आदेशानुसार उप वनसंरक्षक, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली उल्लेखित समिती गठीत केली होती.

वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अवशेष योग्य पद्धतीने आणि कायद्यानुसार नष्ट करणे ही पर्यावरणीय तसेच प्रशासकीय दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारची नियमानुसार व पारदर्शक कार्यवाही सर्वच प्राणी संग्रहालयांमध्ये वेळोवेळी राबवली जावी, असे वनविभागाचे स्पष्ट मत आहे.

ही कार्यवाही वन्यजीव सन्मानाने हाताळण्याच्या, कायद्याचे पालन करण्याच्या आणि गैरवापर रोखण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असल्याचे उप वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top