Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

दिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेच

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

गूढ कॉलने दिल्ली ते पुणे सुरक्षा यंत्रणा अलर्टमोडवर

marathinews24.com

पुणे – दिल्लीतील ऐतिहासिक आणि गजबजलेल्या चांदणी चौक परिसरात मोठा बॉम्बस्फोट घडविण्याचा कट पुण्यातून रचला गेल्याची धक्कादायक माहिती ८ फेब्रुवारीला दुपारी दिल्ली पोलिसांना अनोळखी व्यक्तीने फोनवरून दिली. काही मिनिटांतच राजधानीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या. मात्र प्रत्‍यक्षात चौकशी वेगेळाच प्रकार समोर आला.

वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फोनवरील व्यक्तीने दिल्ली पोलिसांना फोन करून पुण्यातील बुधवार पेठेतील एका हॉटेलमधून दिल्‍लीतील चांदणी चौकत मागे झालेल्‍या स्फोटाचा कट रचण्यात आल्‍याची व संबंधित हॉटेल मालकाला यासाठी तब्बल २० कोटी रुपये मिळाले असल्‍याची माहिती फोनद्वारे दिल्‍ली पोलिसांना दिली. तसेच हॉटेल मालकाच्‍या घरात अद्यापही बॉम्बनिर्मितीसाठी वापरले जाणारे आरडीएक्सचा बॉक्स ठेवलेला आहे, असा सनसनाटी दावा त्‍या व्यक्‍तीने फोनवर केला. माहितीची गंभीरता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी तात्काळ एनआयएला सतर्क केले. काही क्षणांतच तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली. दिल्लीहून थेट पुणे पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधण्यात आला.

‘पुणे कनेक्शन’चा धागा समोर येताच स्थानिक पोलिसांनीही तांत्रिक तपास सुरू केला. कॉलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर पथक कामाला लागले. नंबर ट्रेस होताच पुण्यातील एका घरापर्यंत तपास पोहोचला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. काही तासांच्या धावपळीनंतर चित्र हळूहळू स्पष्ट झाले. संपूर्ण घटनाक्रमाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. चौकशीत कॉल करणारी व्यक्ती कोविडकाळात याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. मात्र विचित्र वर्तनामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. त्या रागातूनच त्याने हॉटेल मालकाला अडचणीत आणण्यासाठी ही बनावट माहिती पसरवल्याचे उघड झाले.

धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारचे दिशाभूल करणारे फोन करून पोलिसांना त्रास दिल्याच्या तक्रारी होत्या.
अखेरीस, दिल्ली ते पुणे सुरक्षा यंत्रणांना काही तास धावपळ करायला लावणारा ‘बॉम्बस्फोटाचा कट’ हा केवळ एका माथेफिरूच्या सूडबुद्धीतून केलेला खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. कायदेशीर तरतुदीनुसार त्याची चौकशी करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र एका फोनने निर्माण केलेला थरार आणि शेवटी उघड झालेला प्रकार याने यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×