Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाई

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरात मसाज सेंटर (स्पा) आडून वेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणाऱ्या दलालाला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दणका दिला आहे. संबंधिताला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. धनराज शामराव जाधव असे त्याचे नाव असून, त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे.

पुण्यात गुटखा तस्करांना अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त – सविस्तर बातमी

धनराज हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार, पुणे छत्रपती संभाजीनगर, ठाणे शहरात गुन्हे दाखल आहेत. मसाज सेंटरच्या आडून तो तरुणींना आर्थिक प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. तो बिनदिक्तपने तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. त्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर कडक कारवाई करणे गजेचे होते. १४ जानेवारी २०२५ मध्ये धनराजवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून तो फरार झाला होता.

मसाज सेंटरच्या आडून देहविक्रीची दुकाने चालविणाऱ्या दलालापैकी धनराज आहे प्रमुख आहे. पुणे शहरात त्याचे मोठ्या प्रमाणत मसाज सेंटर (स्पा) आहेत. तसेच तो एकट्या पुण्यात हा व्यवसाय न करता संभाजीनगर, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, मुंबई अशा विविध ठिकाणच्या शहरात देहविक्रीचे रॅकेट चालवित आहे. एवढेच नाही तर त्याचे बाहेरच्या राज्यात देखील मसाज सेंटर असून, तेथे देखील तो हे रॅकेट चालवितो. त्याच्या स्पा सेंटरवर अनेकदा पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र तो काही केल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शहराच्या बाहेरून तो हे रॅकेट चालवित असे. २०२४ मध्ये धनराजवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या गुन्हेगारी कृत्याची दखल घेत तत्कालीन वानवडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी स्थानबद्धतेचा प्रस्तावर पोलिस उपायुक्तांच्या मार्फत सादर केला होता. त्यानुसार जानेवारी 2025 मध्ये धनराजवर स्थानबद्धतेची कारवाई केली. कारवाईची चाहूल लागताच तो पुण्यातून फरार झाला होता. दरम्यान, पोलिस त्याच्या शोधावर होते. शनिवारी (दि.७) धनराज वानवडी परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर कारागृहात एक वर्षासाठी करण्यात आली आहे.

स्पा माफियांना इशारा

शहरातील स्पा, मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलालांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी इशारा दिला आहे. कोणतेही गैर प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, तशा सुचना त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या असून, वेळोवेळी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेक स्पा माफियांनी शहरातून काढता पाय घेतला आहे. अशातच आता थेट धनराज याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत आमची सुरूवातीपासूनच स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे अशा दलालांवर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची रवानगी थेट कारागृहात केली आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×