Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सोसायटी स्थापनेसाठी ३ हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी

दापोडीतील उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांविरुद्ध ‘एसीबी’कडून गुन्हा

marathinews24.com

पुणे -सोसायटी नोंदणीनंतर उपविधी पुस्तिका (बायलाॅज बुकलेट) देण्यासाठी तीन हजार ७०० रुपयांची लाच घेणाऱ्या दापोडीतील उपनिबंधक कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संगीता किरपाले-चैाधरी, मुकुंद पवार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

राज्यातील ५१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या – सविस्तर बातमी

तक्रारदार पिंपरी-चिंचवड शहरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या सोसायटीतील सर्व सदस्यांनी सोसायटी नोंदणीबाबत २५ मार्च रोजी दापोडीतील उपनिबंधक कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्या वेळी उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संगीता किरपाले-चौधरी, मुकुंद पवार यांनी एका सभासदासाठी ७०० रुपये लाच मागितली होती. त्यानुसार १६ सभासदांच्या सोसायटी नोंदणीसाठी ७०० रुपये प्रमाणे ११ हजार २०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर साडेसात हजार रुपये अगोदर घेण्यात आले. सोसायटी नोंदणी करुन याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले होते, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

लाचेची संपूर्ण रकम मिळाली नसल्याने तक्रारदाराल उपविधी पुस्तिका देण्यात आली नव्हती. ही पुस्तिका घेण्यासाठी तक्रारदार उपनिबंधक कार्यालयात गेले होते. त्या वेळी अधिकारी किरपाले-चौधरी, पवार यांनी तक्रारदाराकडे तीन हजार ७०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी दापोडीतील उपनिबंधक कार्यालयात सापळा लावला.

तक्रारदाराकडून ३७०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरा दोघांविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अशीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×