पुण्यात नवीन ३ पोलीस उपायुक्त
marathinews24.com
पुणे – राज्य शासनाच्या गृह विभागाने ठिकठिकाणी कार्यरत असलेल्या तब्बल ५१ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार पुणे शहरात ३ नवीन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्यातील दोन उपायुक्तांची बदली झाली आहे. शुक्रवारी (दि. २७) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचेही सूचित केले आहे.
राष्ट्रीय शालेय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद – सविस्तर बातमी
गृह विभागाने केलेल्या बदल्यानुसार पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली केली आहे. उपायुक्त झेंडे यांनी पुणे शहर पोलीस दलात गुन्हे शाखेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १८०० किलो एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दापाश केला होता. तर परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त म्हणून स्मार्तना पाटील यांनीही वेगवेगळ्या महत्त्वाच्या कामगिरीत प्रमुख भूमिका बजावली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा शासनाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार पुणे शहरात नव्याने ३ पोलीस उपायुक्तांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांची छत्रपती संभाजीनगर येथून, कृषिकेश रावले यांची सिंधुदुर्ग येथून तर राजलक्ष्मी शिवणकर यांची दौंड येथून पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली केली आहे.
बदली झालेले पोलिस अधिकारी
१) सोमय मुंडे – पोलिस उपायुक्त, छत्रपती संभाजीनगर ते पोलिस उपायुक्त, पुणे
२) कृषिकेश रावले – अपर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग ते पोलिस उपायुक्त, पुणे
३) राजलक्ष्मी शिवणकर – समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, दौंड ते पोलिस उपायुक्त, पुणे
४) अमोल झेंडे – पोलिस उपायुक्त, पुणे ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, दौंड
५) स्मार्तना पाटील – पोलिस उपायुक्त, पुणे ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
६) अश्विनी सानप – पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे
७) मनिषा दुबळे – पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर ते पोलिस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे
८) तेजस्विनी सातपुते – पोलिस अधीक्षक, शस्त्र निरीक्षण शाखा, पुणे ते समादेशक, राज्य राखीव पोलिस बल, गट क्रं. १, पुणे
९) एम. एम. मकानदार – प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते पोलिस अधीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
१०) स्वप्ना गोरे – पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते समादेश, राज्य राखीव पोलिस बल, गट क्रं. २, पुणे
पुण्यातील गुन्हे शाखेतही खांदेपालट, युनीटचे बहुतांश अधिकारी बदलले
कायदा सुव्यवस्था बजावण्यात महत्वाची कामगिरी करणार्या पुणे गुन्हे शाखेतील बहुतांश युनीटच्या अधिकार्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हजर झालेल्या नवीन अधिकार्यांची नियुक्ती करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार आता नव्या दमाच्या अधिकार्यांकडून गुन्हेगारांची झाडाझडती, डिटेक्शन, हद्दीतील शांतता प्रस्थापित करण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे गुन्हे शाखेत नव्याने पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक असे मिळून १६ जण हजर झाले आहेत. त्यानुसार संबंधिताची युनीटसह विविध पथकांत नियुक्ती केली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांची प्रशासन सेवा प्रणाली, क्राईम कंट्रोल याठिकाणी नियुक्ती केली आहे. तर पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची युनीट एक, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान युनीट दोन, पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील युनीट तीनपदी नियुक्ती केली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांची अमली पदार्थ विरोधी पथक एक, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोन, तर पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक भरोसा सेलपदी नियुक्ती केली आहे.
पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड एमओबी, सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम युनीट चार, एपीआय संदीप बर्गे युनीट एक, एपीआय अनिल सुरवसे अमली पदार्थ विरोधी पथक एक, एपीआय कल्याणी कासोदे कन्व्हेक्शन सेल, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे युनीट तीन, उपनिरीक्षक वैशाली तांगडे टीएडब्ल्यू, उपनिरीक्षक प्रियांका गोरे क्राईम कंट्रोलपदी नियुक्तीचे आदेश अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान, नव्याने हजर झालेल्या पोलीस अधिकार्यांना कायदा सुव्यवस्थेसह हद्दीतील शांतता प्रस्थापित करण्यावर भर द्यावा लागणार आहे.