Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुणे विमानतळाला पेशव्यांचे नाव देण्याची मागणी 

पुणे विमानतळाला पेशव्यांचे नाव देण्याची मागणी 

‘पेशव्यांच्या पराक्रमाला व्याख्यानातून उजाळा 

marathinews24.com

पुणे – ब्राह्मण महासंघाच्यावतीने ‘पेशवा का नकोत?’ या विषयावर व्याख्याते  सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान  ११ ऑगस्टला रात्री नऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केले होते. व्याख्यानात बोलताना ‘बाजीराव पेशवा यांचे नाव पुणे विमानतळाला  द्यावे’ अशी मागणी सुशील कुलकर्णी यांनी  केली तर बाजीराव पेशवा यांच्या नावाने राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार सुरु करावा, अशी भूमिका  ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली.

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे भक्ती व समाजसेवेचा संगम – सविस्तर बातमी 

कार्यक्रमात सचिन बोधनी,अभय ओरपे, गिरीश गुर्जर यांच्या नेतृत्वात १०० कार्यकर्त्यांनी ब्राह्मण महासंघामधे नुकताच प्रवेश केला होता. त्यांना पदांची जबाबदारी कार्यक्रमात देण्यात आली. मनोज तारे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नितीन शुक्ल यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अनेक विविध क्षेत्रातील तज्ञ यांची ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. सुशील कुलकर्णी यांनी अठराव्या शतकातील हिंदवी स्वराज्याच्या विस्तारातील ऐतिहासिक घटनांचा सखोल आढावा घेतला. विशेषत: पेशव्यांच्या कारकीर्दीतील राजकीय, लष्करी आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास करत त्यांनी त्या काळातील परिस्थितीचे विश्लेषण मांडले.

कुलकर्णी म्हणाले, बाजीरावांची पेशव्यांची बाजू मांडताना जातीचा उल्लेख महत्वाचा नाही. कर्तृत्वाचा उल्लेख महत्वाचा आहे. पानिपतच्या लढाईनंतर मराठी राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही.लढाया जिंकण्याबरोबर धर्मासाठी, धर्मरक्षणासाठी,धर्मस्थळांसाठी पेशव्यांनी उत्तम काम केले. फक्त, मस्तानीसाठी पेशव्यांचा उल्लेख करणे योग्य नाही. आता पुढील पिढ्यानी पराक्रमासोबत उद्योजकतेची कास धरली पाहिजे. वैभवशाली इतिहास शिकवला पाहिजे’.

आनंद दवे म्हणाले,’आपल्या संघटित प्रयत्नातून दाता आणि शूर पिढी निर्माण केली पाहिजे. पेशवे, सावरकर,फडके यांचा इतिहास विशिष्ट जातीमुळे दुर्लक्षित केला जाऊ नये. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि तरुणवर्ग उपस्थित होता. उपस्थितांनी विषयाची मांडणी आणि सखोल विश्लेषण यांचे कौतुक केले. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की अशा कार्यक्रमांद्वारे इतिहासातील महत्वाच्या पैलूंबाबत जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न सुरू राहील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×