स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
marathinews24.com
अहिल्यानगर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुऱ्हाणनगर येथे आमदार स्व. शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शेतकऱ्यांना दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल उपसभापतीनी मानले आभार – सविस्तर बातमी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्व. कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले, आमदार संग्राम जगताप तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. शिवाजी कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी आमदार काशिनाथ दाते, आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, स्व. शिवाजी कर्डीले यांचा लोकसंपर्क अत्यंत दांडगा होता. सरपंच पदापासून ते इथंपर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत संघर्षातून केला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाली असून कधीही भरून न निघणारी अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर झटणारे नेतृत्त्व होते. त्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात कायमचा ठसा उमटविला.





















