उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनगर विद्याप्रसारक मंडळाला १०१ लॅपटॉपचे हस्तांतरण

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवनगर विद्याप्रसारक मंडळाला १०१ लॅपटॉपचे हस्तांतरण

एचडीएफसीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १०१ लॅपटॉपचे शिवनगर विद्याप्रसारक मंडळाला हस्तांतरण

marathinews24.com

बारामती – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एचडीएफसीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून देण्यात आलेल्या १०१ लॅपटॉपचे माळेगाव येथील शिवनगर विद्याप्रसारक मंडळाला हस्तांतरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पिंकी माळी यांच्या वारसाला पाच लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द – सविस्तर बातमी  

यावेळी माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलावडे, एचडीएफसी बँकेच्या राज्यप्रमुख स्वाती शाळीग्राम, पुणे क्षेत्रप्रमुख विदुला देशपांडे, बारामतीच्या क्षेत्र प्रमुख दत्ता राजूरकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वप्नातली शिक्षण संस्थेची निर्मिती आणि विकास करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे, याकामी एचडीएफसी बँकेचे मोलाची साथ लाभली आहे, याबद्दल एचडीएफसीच्या बँकेचे पवार यांनी आभार मानून यापुढे संस्थेला अशाप्रकारे मदत करावी, आवाहन केले.

डॉ. ठोंबरे म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामकाजात सुधारणा करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री यांचे धोरण विषयक सल्लागार डॉ. संतोष भोसले यांच्या प्रयत्नातून संस्थेला १०१ लॅपटॉप, ३६ इंटर ऍक्टिव्ह स्क्रीन, शाळांसाठी दोन स्टेम लेबोरेटरीज मंजूर झाल्या आहेत. मुलींना शाळेत येण्याजाण्यासाठी ३०० सायकलींना मंजुरी मिळाली आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगा विरुद्ध एचपीव्ही लसीकरण करण्यात येत आहे, असेही डॉ. ठोंबरे म्हणाले.

यावेळी विश्वस्त राजेंद्र काटे, धन्यकुमार जगताप, विराज खलाटे, प्रवीण पोंदुकुले, रोहन देवकाते, डॉ. मोहन नेवसे, गणपतराव देवकाते,आशा जराड, प्रल्हाद वरे, गौरव जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक, नगरसेवक आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×