Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश

भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

marathinews24.com

मुंबई – टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

मराठवाड्यातल्या अडीच हजार आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासनाने दिली मदत – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, भारतीय संघाने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, संघभावना आणि समर्पित खेळभावना ही संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे.

या ऐतिहासिक विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय संघाने भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात अधिक उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×