Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

दिवंगत सुरेश कलमाडी यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ नेते, माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कलमाडी हाऊस येथे जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी कलमाडी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

पुण्याच्या जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले-मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या “पुण्यातील गणेशोत्सव तसेच इतर सणवार आणि संस्कृती कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा सुरेश कलमाडी यांनी सुरू केली आणि त्याला एक वेगळाच दर्जा मिळवून दिला. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना राजकारणात आरक्षण मिळाल्यानंतर कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात महिलांना राजकारणात मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. अगदी महापौरपदीही महिलेची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये महिला स्वच्छतागृह उभारण्यासाठी दिले होते. ते अत्यंत समाजाभिमुख होते, लोकांच्या कामासाठी अग्रेसर राहणारे आणि सर्वांना सांभाळून घेणारे नेतृत्व होते.”

“काही काळ त्यांनी शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. त्यावेळी कामानिमित्त माझा त्यांच्याशी अनेकदा संपर्क येत असे. गेले काही दिवसांपूर्वीच त्यांनी गणेशोत्सवाच्या कामासंदर्भात मला संपर्क केला होता. अशा कार्यक्षम लोकप्रतिनिधीला शिवसेना पक्षाच्या वतीने आणि विधानपरिषद उपसभापती या नात्याने मी श्रद्धासुमन अर्पण करते.” अशा शब्दात त्यांनी कलमाडी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×