Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

बिबट्यांचे वाढते हल्ले आणि समस्यावर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तत्पर भूमिका

स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दाखविलेल्या तातडीच्या आणि संवेदनशील प्रतिसादाचे जनतेकडून कौतुक

marathinews24.com

शिरूर – तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दाखविलेल्या तातडीच्या आणि संवेदनशील प्रतिसादाचे जनतेकडून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी शिरूर-आंबेगाव परिसरातील नागरिकांच्या वतीने डॉ. गोऱ्हे यांना पत्र पाठवून त्यांच्या प्रयत्नांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

हास्ययोग म्हणजे तणावमुक्त, आनंदी जीवनाचे प्रभावी औषध – सविस्तर बातमी

बांगर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, डॉ. गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार मृत बालिका शिवन्या शैलेश बोंबे यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासन व वनविभागाच्या वतीने तत्काळ १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. अशा कठीण प्रसंगी कुटुंबाला आधार देण्याचे कार्य त्यांनी संवेदनशीलतेने पार पाडले, हे अत्यंत समाधानकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, शिरूर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड हे तालुके ‘Leopard Conflict Management Zone’ म्हणून घोषित करण्याची आणि “Wildlife Conflict Command Center”, GIS आधारित मॅपिंग तसेच विमा योजनेच्या संकल्पना राबविण्याची डॉ. गोऱ्हे यांनी केलेली दूरदृष्टीपूर्ण मागणीही बांगर यांनी अत्यंत स्वागतार्ह ठरविली आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, “डॉ. गोऱ्हे यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे या भागातील जनतेमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना दृढ झाली आहे. त्यांनी दाखविलेली तत्परता आणि सकारात्मक दृष्टिकोन हा लोकप्रतिनिधींसाठी आदर्श आहे.” शिरूर–आंबेगाव परिसरातील जनतेच्या वतीने सचिन बांगर यांनी डॉ. गोऱ्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, बिबट समस्या सोडविण्याच्या त्यांच्या पुढाकाराला पाठिंबा देण्याची भूमिका व्यक्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×