Breking News
दुकानातून टायर चोरणारा गजाआडराज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांचा ९० व्या वाढदिवसानिमित्त सन्मानउप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूलभारती विद्यापीठ ‘आयएमईडीमध्ये बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामपुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबंदमोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

राज्यातील सर्वच बालगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी नव्याने कार्यप्रणाली निश्चित करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील सर्वच बालगृहांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी नव्याने कार्यप्रणाली निश्चित करा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर छावणीतील बालगृहातील घटनेच्या अनुषंगाने बैठक

marathinews24.com

मुंबई – छत्रपती संभाजीनगर छावणी येथील बालगृहात घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांची सद्यस्थिती, आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकपार पडली.
बैठकीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय, आमदार चित्रा वाघ, आमदार प्रज्ञा सातव, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे , सहआयुक्त राहुल मोरे उपस्थित होते.

संस्थांच्या सर्वेक्षणासाठी प्रश्नावली निश्चित करणे,तपासणीसाठी भरारी पथके नियुक्त करणे व बालगृहातील मुलींचा त्यांच्या पार्श्वभूमी व आवडीनुसार बालगृहात सामावून घेणेबाबत विचार करणेबाबत डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत संबंधित विभागाला सूचना दिल्या. राज्यातील बालगृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित सुधारणा करणे, देखरेख यंत्रणा अधिक बळकट करणे, बालकांचे हक्क संरक्षित राहावेत यासाठी स्वतंत्र निरीक्षण समित्या स्थापन करणे, तसेच बालगृह व्यवस्थापनात पारदर्शकता वाढवण्याबाबत उपाययोजना करण्यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.या महत्त्वपूर्ण चर्चेच्या अनुषंगाने लवकरच ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील, असे मंत्री महोदयांनी आश्वस्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top