Breking News
राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांच्या मुलासह व्याहीविरूद्ध गुन्हा दाखलरास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येचताेतया वकील महिलेने उकळली ६ लाखांची खंडणीसफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांचा डाटाबेस तयार करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणीडी.एल.एड. द्वितीय वर्षाच्या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ३० मे रोजीनीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोनमुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावावाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधीपुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला

माहिती विभाग आणि पत्रकार संघाच्या विद्यमाने विकास पत्रकारिता कार्यशाळा संपन्न

माहिती विभाग आणि पत्रकार संघाच्या विद्यमाने विकास पत्रकारिता कार्यशाळा संपन्न

शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – विभागीय माहिती कार्यालय पुणे आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार भवन येथे माध्यम प्रतिनिधींना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास अजित पवार यांच्या नियोजन विभागाची प्रशासकीय मान्यता – सविस्तर बातमी 

यावेळी राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य एस. एम. देशमुख, स्वप्नील बापट, शरद पाबळे, विभागाचे माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे, पुणे सदस्य सुनीत भावे, चंद्रसेन जाधव, पुणे पत्रकार संघाचे खजिनदार शिवाजी शिंदे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव आदी उपस्थित होते.

डॉ. मोघे म्हणाले, माहिती व जनसंपर्क विभागाच्या संकेतस्थळावर पत्रकारांसाठीच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्ष पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विकास पत्रकारिता वास्तवाचा स्वीकार करणे, विश्लेषण करणे, मूल्यांकन करणे आणि सामाजिक जबाबदारी या चार पैलूंवर आधारीत आहे. अशा पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे विकास पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतात. यासोबतच पत्रकारांसाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत.

स्व. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून विविध आजारांवरील उपचारांसाठी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना, त्यांच्यावर अवलंबून असणारे पती/पत्नी आणि दोन मुलांनाही १५ हजारापासून ते १ लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. तसेच केंद्र शासनाच्या पत्रकार कल्याण योजनेअंतर्गतही अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि किमान ५ वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अर्थसहाय्य करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ.मोघे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि अधिस्विकृती संबंधितच्या नियमावलीचीही माहिती दिली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पत्रकारांना योजनांचा लाभ देण्यासाठी माहिती विभागाची नेहमीच सकारात्मक भूमिका राहील, असेही डॉ.मोघे म्हणाले.

एस. एम. देशमुख म्हणाले, बहुसंख्य पत्रकारांना आपल्या लाभाच्या योजनाची माहिती नसल्याने योजनांपासून वंचित राहत होते. त्यामुळे माहिती व जनसंपर्क विभागाने या योजनांच्या माहितीची पुस्तिका काढून त्याचे वितरण करावे. शासकीय योजनांचा अधिकाधिक पत्रकारांना लाभ व्हावा यासाठी शासनाकडे राज्य अधिस्विकृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत आहे. अधिस्वीकृतीसाठी आपण कोणत्या संवर्गात पात्र ठरतो याचा अभ्यास करुन पत्रकारांनी अर्ज केल्यास अधिस्वीकृती मिळण्याची कार्यवाही लवकर होते, असेही ते म्हणाले. पत्रकारांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त असून कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार सन्मान योजनेंतर्गत प्रति लाभार्थी दरमहा ११ हजार रुपये सन्मान निधी देण्यात येतो. देशात इतकी मोठी रक्कम देणारी योजना राबविणारे इतर कोणतेही राज्य नाही. सन्मान योजनेचा लाभही अधिकाधिक पत्रकारांना मिळावा यादृष्टीनेही प्रयत्न होत आहेत. पत्रकारांनी योजनेची माहिती जाणून घ्यावी आणि अधिकाधिक अर्ज करावेत. त्याचा अधिकाधिक पत्रकारांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत, असेही ते म्हणाले. यावेळी देशमुख यांनी अधिस्वीकृतीसाठीचा वरिष्ठ पत्रकार संवर्ग, कोटा पद्धती, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे आदींची माहिती देऊन याबाबत पुणे अधिस्वीकृती समितीकडून चांगला पुढाकार घेतल्याचे नमूद केले.

पाटणे म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका आणि अन्य योजनांची माहिती नसल्याने त्यांच्याकडून अर्ज येत नाहीत. मात्र गेल्या दीड वर्षात पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्यावतीने पत्रकारांना माहिती देण्यात आल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, त्यामुळे ग्रामीण पत्रकारांना या सुविधेचा लाभ देता आला. अर्जाची काटेकोर तपासणी केली जातेच परंतु अर्जात काही त्रुटी असल्यास समितीकडून त्रुटी दूर होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते. लवकरच सातारा येथेही अशी कार्यशाळा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात भावे यांनी पत्रकारांसाठीच्या योजनांची पत्रकारांना माहिती असणे आवश्यक असून त्यासाठी पुणे श्रमिक पत्रकारसंघाने पुढाकार घेऊन कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित पत्रकारांच्या शंकांना उत्तरे देण्यात आली. विविध वृत्तपत्रांचे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी कार्यशाळेस उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top