Breking News
LokSamvad 2026 Baramati : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृतीफ्लॅटचे कुलूप तोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपासPune Crime : पसार झालेल्या फरार आरोपीला पकडलेPune Traffic Changes : गणेशोत्सवात पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीस बंदLokSamvad 2026 Pune : गणेश मंडळांच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती; पुणे शहरात ‘लोकसंवाद’ उपक्रमाला प्रारंभPune Crime News : दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरीलाDevendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीSantosh Pandit : पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित यांना जामीनसमाजात समानता, एकोपा सौख्य नांदावे; श्री गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे साकडेविद्यार्थी वाहतूक करणार्‍या एसटीचा अपघात

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी

Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीचा दौरा

marathinews24.com

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच आरती केली. यावेळी विविध गणेश मंडळांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानाचा कसबा गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, साने गुरुजी तरुण मंडळ तसेच श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्ट येथील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली. तसेच महापौर मंजुषा नागपुरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.

 

समाजात समानता, एकोपा सौख्य नांदावे; श्री गणरायाच्या चरणी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे साकडे – सविस्तर बातमी 

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार नितीन नबीन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, योगेश टिळेकर, हेमंत रासणे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासणे, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी ढोल वाजविण्याचा घेतला आनंद

श्रीसाई मित्रमंडळ ट्रस्टच्या गणपती परिसरात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पारंपरिक ढोल-ताशा गजरात पथकाने स्वागत केले. यावेळी त्यांनी ढोल वाजविणाऱ्या युवकाकडून टिपरू काठी घेत स्वतः ढोल वाजविण्याचा आनंद घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×