Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय उपक्रम

‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ २८ सप्टेंबरला

marathinews24.com

पुणे – संतांचा वसा, वारकर्‍यांचा वारसा आणि अभंगांचे अमृत हेच महाराष्ट्राचे वैशिष्टय आहे. या वारकरी परंपरेला आणि संस्कृतीला अभिवादन म्हणून महाराष्ट्रात प्रथमच मिलिंद दादा वाळंज युवा मंचाच्या वतिने ‘खेळ रंगला वारकर्‍यांचा’ हा अभिनव व भक्तिमय उपक्रम साजरा करण्यात येत आहे. हा आगळा-वेगळा उपक्रम रविवार, २८ सप्टेंबरला सुस येथील सनीज वर्ल्डमध्ये साजरा करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारों वारकरी, कीर्तनकार व प्रवचनकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता मिलिंद वाळंज, वारकरी सांप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्र. ९६ चे हभप दशरथ महाराज वाहले, हभप पांडूरंग महाराज पारखी, प्रविण माताळे व अमित अखाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शंभर खाटांचे आरोग्य पथक रुग्णालयाचे भूमिपूजन – सविस्तर बातमी

महाराष्ट्राच्या भूमीत भक्ती, श्रध्दा, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे अमूल्य दर्शन घडविणारा हा उपक्रम मा. मिलिंद दादा वाळंज युवा मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ता व युवा उद्योजक मिलिंद नंदकुमार (बाबूजी) वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमाची वैशिष्टये म्हणजे वारकरी परंपरेतील पारंपरिक खेळ, विरंगुळा, आनंद मेळावा व भक्तिरसात न्हाऊन निघविणारे अभंग गायन होणार आहे. येथे वारकरी परंपरेचे विविध पैलंचेू खेळ, भक्तिगीत, गवळणी व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यामध्ये सहभागींतील पहिल्या १० भाग्यवान विजेत्या जोडप्यांना विमानाने काशी दर्शन घडविण्यात येईल. खेळाबरोबर अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या उपक्रमातून वारकरी जीवनशैली,भक्ती आणि संस्कार तसेच यातून आनंद यांचे दर्शन घडणार आहे.

या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून वारकरी संप्रदायाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आयोजक मिलिंद नंदकुमार वाळंज यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×