Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा

पुण्यात बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

marathinews24.com

पुणे – शहरात बेकायदा जाहिरातफलक, तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. आठवडाभरात शहरातील सर्व बेकायदा फलक काढण्यात येणार असून, बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हा करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. बेकायदा फलक (होर्डिंग्ज) लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यावेळी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहावे; लोकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश – सविस्तर बातमी 

अमितेशकुमार म्हणाले, ‘महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली. बेकायदा फलकांमुळे शहर विद्रूप दिसते. अशा प्रकाराच्या फलकांमुळे शहराच्या प्रतिमेवर परिणाम होताे. बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार महापालिका आणि पोलिसांकडे आहे. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि काही व्यावसायिक बेकायदा फलक लावतात. अशा प्रकारचे फलक काढण्यासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभरात शहरातील सर्व बेकायदा फलक काढण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. फलक तयार करणाऱ्या व्यावसायिकांचीही यादी तयार करण्यात आली आहे.’

‘पावसाळ्याआधी करण्यात येणाऱ्या कामांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात पाणी साचणारी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पाणी साचणाऱ्या ४०० ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. ज्या भागात पाणी साचते, अशा ठिकाणी पावसाळ्याआधी कामे करण्यात यावीत, याबाबत चर्चा करण्यात आली. पाणी साचणाऱ्या ४०० ठिकाणांची यादी महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

बेवारस, धूळखात पडलेल्या वाहनांवर कारवाई

‘शहरात रस्त्याकडेला वाहने लावण्यात येतात. ती जागेवरून काढलीही जात नाहीत. धूळखात पडलेल्या वाहनांच्या मालकांना ते काढण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीस अडथळा ठरणारी बेवारस वाहने काढण्याबाबत महापाालिका अधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा करण्यात आली. ही बेवारस वाहने महापालिका उचलेल आणि त्याचा खर्च संबंधित वाहनमालकाकडून वसूल केला जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न

‘शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. गुटखा बंदीवर पोलीस ठाम आहेत. शहर विद्रूप करणे, बेवारस वाहनांवर कारवाई करून शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद केले.

अतिक्रमणांवर कडक कारवाई

‘शहरात विकासकामे सुरू आहेत. विकासकामे सुरू असताना त्याला शिस्त असणे आवश्यक आहे. अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवून वाहतुकीचा वेग वाढण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. प्रमुख रस्त्यांवर वाहतूकविषयक सुधारणा करण्यात आल्या आहेत. शहराचा लौकिक वाढविणे, तसेच वाहतूकविषयक सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होत असेल, तर आता वेगळा विचार करावा लागेल. प्रत्येक प्रभागनिहाय महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. पुणे शहरात प्रत्यक्षात पाच ते सहा लाख पथारी व्यावसायिक आहेत. त्यांपैकी केवळ २२ हजार पथारी व्यावसायिक अधिकृत आहेत. त्यामुळे अतिक्रमणांवर कडक कारवाई करावीच लागेल.

– नवल किशोर राम, महापालिका आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×