Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

‘सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

किशोर गांगुर्डे यांचे संशोधन समाजमाध्यमांच्या प्रभावी वापरावर आधारित; शासनाच्या माहिती प्रसारातील डिजिटल माध्यमांची भूमिका अधोरेखित

marathinews24.com

मुंबई – राज्याचे माहिती आणि जनसंपर्क संचालक किशोर गांगुर्डे यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ‘वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन’ विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते श्री. गांगुर्डे यांना पीएच.डी. पदवीची अधिसूचना देऊन सन्मानित करण्यात आले.

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात पुर्नगठीत राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न – सविस्तर बातमी

‘महाराष्ट्र शासनाच्या माहिती प्रसारणासाठी समाजमाध्यमांचा वापर आणि प्रभाव : एक अभ्यास’ (A Study on the Use and Impact of Social Media for Information Dissemination by the Government of Maharashtra) या विषयावर श्री. गांगुर्डे यांनी संशोधन करुन शोधप्रबंध सादर केला होता. शासनाचे निर्णय, लोकाभिमुख योजना, धोरणे आणि माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात समाजमाध्यमांची भूमिका किती प्रभावी ठरते, याचे सखोल विश्लेषण त्यांनी या संशोधनात केले आहे. या संशोधनासाठी त्यांना विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेचे माजी संचालक प्रा. डॉ. सुधीर भटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्य शासनाच्या सेवेतील जनसंपर्क व प्रसिद्धीविषयक कामाचा दोन दशकांपेक्षा अधिक कालावधीचा अनुभव तसेच माहिती व जनसंपर्क विभागात सोशल मीडिया शाखेची त्यांनी केलेली सुरुवात यामुळे श्री. गांगुर्डे यांचे हे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. शासकीय माहिती प्रसारासाठी शासनात सोशल मीडियाची सुरुवात करुन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 2018 मध्ये नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गांगुर्डे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×