वाद मिटवायला गेलेल्यावर हल्ला; तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार
Marathinews24.com
पुणे – वाद सोडविणार्या तरुणाला तिघांनी लोखंडी वस्तूने डोक्यात मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी साई शिर्के (वय.22), अथर्व कदम (वय.23,राहणार दोघे शिवाजीनगर), निखील धाईंजे (वय.25,रा. ओम सुपर मार्केट) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश विजय पंडीत ( वय.32, रा. शिवाजीनगर गावठाण) याने फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.13) दुपारी दिड वाजताच्या सुमारास शिवाजीनगर गावठाण परिसरात घडला आहे.
पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिवाजीनगर गावठाण येथे हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात जेवण वाढत होते. त्यावेळी फिर्यादीचा मित्र कुणाल खेडेकर याला आरोपी मारहाण करत होते. आरोपींनी मद्यप्राशन केले होते. हा प्रकार सुरू असताना, फिर्यादी त्यांचा वाद सोडविण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.