Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पालखी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आदेश

marathinews24.com

पुणे – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे, यादृष्टीने ग्रामीण हद्दीत पालखी प्रस्थान सोहळा बंदोबस्त ११ ते १५ जुलै या कालावधीत असून पालखी मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल करुन ती पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

कलाकारांनी कायम शिकत राहणे आवश्यक – दिग्दर्शक मधुर भांडारकर – सविस्तर बातमी 

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) : ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून ते १३ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणेकडून सासवडकडे दिवेघाट व बोपदेव घाटमार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे, या मार्गावरील वाहने खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे जातील. सासवडकडून पुणे बाजुकडे येणारी वाहतूक गराडे-खेड-शिवापूर मार्गे वळविण्यात येणार आहे.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्काम) आणि जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) : १३ जुलै रोजी पहाटे २ वा. पासून ते १४ जुलै राजी १२ वा. पुणे येथून सासवड-जेजूरी-वाल्हे-निराकडे तसेच नीरायेथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-निरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्काम) : १५ रोजी पहाटे २ वा पासून ते १५ रोजीचे सायं ५ वा. पर्यंत पुणे येथून सासवड-जेजुरी-वाल्हे-निराकडे तसेच निरा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे : १५ ते १८ जुलै या कालावधीत फलटण लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळमार्गे पुणेकडे येतील. तसेच पुणे येथून फलटण व लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळमार्ग जाईल. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×