Breking News
Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय पुजा संपन्न

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय पुजा संपन्न

भीमाशंकर महोत्सव आयोजन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा मानस

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात विधिवत शासकीय पूजा करुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. येत्या काळात परिसरातील नागरिकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्यादृष्टीने येत्या काळात ‘भीमाशंकर महोत्सव’ आयोजन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी उप विभागीय अधिकारी अनिल दौडे, मंदिर समितीचे पदाधिकारी, स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘किराना परंपरा’ मालिकेत उलगडले उस्ताद रजब अली खाँ यांचे सांगीतिक योगदान – सविस्तर बातमी 

डुडी म्हणाले, देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात भाविक येत असतात. आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार असून त्याचा विचार करता मंदिराच्या विकासासोबतच परिसरातील रस्ते,पाणी पुरवठा, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प ‘एसटीपी’ ची कामे करण्यात येत असून ती लवकरच पूर्ण होतील, अशा विश्वास डुडी यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले मंदिर परिसरातील विकासकामाकरिता ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत भविकांची सुरक्षितता विचारात घेता मंदिर बंद ठेवण्यात आले आहे, कामाची पाहणी केली असता दर्जेदार पद्धतीने विकासकामे होत असून ९ एप्रिलपर्यंत मुख्य मंदिराचे काम पूर्ण होईल व त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे, जरी मंदिर बंद असले तरी श्री भीमाशंकराची दैनंदिन नियमित पूजा होत आहे, त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहन डुडी यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×