येरवाड्यात दिव्यांगांसाठी नवीन सक्षमीकरण कार्यालयाची सुरुवात
marathinews24.com
पुणे -जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय 1 मे 2025 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्व्हे नं. १०४/१०५ आळंदी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, येथे दिव्यांग वित्त विकास महामंडळ या कार्यालयाच्या इमारतीमध्ये कार्यान्वित केल्याचे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण।अधिकारी रोहिणी मोरे यांनी सांगितले आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा या उपक्रमाअंतर्गत प्रादेशिक व जिल्हा स्तरावरील कार्यालये सुरु करणे या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यालयामार्फत दिव्यांग शाळा संहिता, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, नियम आदीबाबत कामे करण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रशासकीय, वित्तीय आणि तदअनुषंगिक अधिकार जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून ‘जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी’ यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत, अशी माहितीदेखील मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.