Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

डॉक्टरांनी एआयचे ज्ञान अद्ययावत करावे…

दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय थायरॉइड परिषदेत डॉ. सी. पलानीवेलू यांचा सल्ला

marathinews24.com

पुणे – “भविष्यातील वैद्यकीय क्षेत्र अतिशय आव्हानात्मक असेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे खूप मोठ्या प्रमाणात बदल घडतील. रोबोटिक सर्जरीच्या पुढे जाऊन आता डॉक्टरांनी एआयचे ज्ञान अद्ययावत करावे. तसेच या क्षेत्रात सर्व सर्जरी या एआयच्या माध्यमातून होतील. पुढील ५ वर्षात आणखी किती बदल घडतील हे सांगणे कठिण आहे. पण डॉक्टरांनी त्यांच्या क्षेत्रातील नव नवीन तंत्रज्ञान व कौशल्य अवगत करून हा बदल स्वीकारावा व आपले कार्य करावे.” असे विचार डॉ.बी.सी.रॉय पुरस्कार विजेते व फादर ऑफ लॅप्रोस्कोपी डॉ.सी. पलानीवेलू यांनी मांडले.

कोथरुडकरांनो मेट्रोला जायचंय… गाडी कशाला बस वापरा – सविस्तर बातमी

कोथरुड येथील श्री सरस्वती कराड रुग्णालय व माईस एमआयटी पुणेच्या एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगांव दाभाडे येथील डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘आंतरराष्ट्रीय थायरॉइड कॉन्क्लेव्ह’ च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बँकॉक, थायलंडचे डॉ. अंगकून अनुवोंग व बार्सिलोना, स्पेन येथील डॉ. पाब्लो मोरेनो लोरन्टे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त विश्वधर्मी  प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच, माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सच्या सह व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड-नागरे, विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, श्री सरस्वती कराड रुग्णालयाचे सीओओ डॉ. तुषार खाचणे, प्रा. डॉ. सचिन नाईक, प्रा.डॉ. संदेश गावडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

थायरॉईड सर्जरीमधील प्रख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची अंतर्दृष्टी सामायिक करणे, अत्याधुनिक तंत्रांचे प्रात्यक्षिक करणे आणि क्लिनिकल प्रॅक्टिस वाढविण्याचा मुख्य उद्देश्याने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये ट्रान्सओरल एंडोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमी, वेस्टिब्युलर अ‍ॅप्रोच, ट्रान्सअ‍ॅक्सिलरी थायरॉइडेक्टॉमी, ओपन थायरॉइडेक्टॉमी आणि रोबोटिक सर्जरी या सारख्या विविध प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. येथे थायरॉइड कॅन्सर, अंतःस्त्रावी शस्त्रक्रियेतील नवकल्पनांचा समावेश असलेल्या थेट शस्त्रक्रियांंची प्रात्यक्षिके, पॅनेल चर्चा आणि वैज्ञानिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ.सी. पलानीवेलू म्हणाले,” मी अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतल्यानंतर गावातील लोकांनी पैसे जमा करून कोइम्बतूर येथून वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गॅस्ट्रालॉजी मध्ये प्रगत ज्ञान अद्ययावत करण्यासाठी सतत शिक्षण घेत राहिलो. त्यामुळे येणार्‍या काळात वैद्यकीय क्षेत्रातील बदलांचा स्विकार करून आपले ज्ञान आत्मसात करावे,” असा सल्ला उपस्थितांना दिला.

डॉ. अंगकून अनुवोंग म्हणाले,” भारतीय संस्कृती आणि थायलंडची संस्कृती मिळती जुळती आहे. येथे झालेल्या परिषदेने आज थायरॉइड क्षेत्रातील नव नवीन अत्याधुनिक ज्ञानाचे सादरीकरण झाले. ज्याचा उपयोग भविष्यात नवोदित सर्जन यांना नक्कीच होईल.” डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” बॉडी, ब्रेन, सोल, स्पीरीट आणि माइंड या गोष्टी सर्व व्यक्तींशी जुळलेल्या असतात. यातूनच त्यांचा सर्वांगिण विकास घडतो. कोरोनाच्या काळात संपूर्ण जग थांबले होते. त्यावेळेस डॉक्टरांची भूमिका ही सर्वात महत्वाची होती. आता वैद्यकीय क्षेत्रात जे आमूलाग्र बदल घडत आहेत त्यांचा स्वीकार सर्वांनी करावा व अविरत रुग्णसेवा करत राहावी.”

डॉ. सुचित्रा कराड-नागरे म्हणाल्या,” श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या माध्यमातून अशी परिषद होणे हे अत्यंत भूषणास्पद आहे. या परिषदेच्या माध्यमातून थायराईड क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांना नव नवीन ज्ञानाची माहिती करुन देण्याचा हा प्रयत्न होता.” तसेच वाढत्या प्रमाणात जागतिक आरोग्य चिंतेच्या विषयांबरोबरच, थायरॉइड विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी तात्काळ निदान, सुरक्षित शस्त्रक्रिया आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोनांचे महत्व त्यांनी या वेळी मांडले.

या परिषदेत थायरॉइड संशोधन आणि शस्त्रक्रियमेध्ये भारताच्या वाढत्या योगदानावर प्रकाश टाकत शैक्षणिक सहकार्य आणि शस्त्रक्रिया उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून त्यांची भूमिका अधोरेखित केली गेली. या परिषदेत भारतभरातून २०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. स्पेन येथील डॉ. पाब्लो मोरेनो लोरन्टे यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या. श्री सरस्वती कराड रुग्णालयाचे सीओओ डॉ. तुषार खाचणे यांनी सर्व पाहुण्याचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ओजस वाधवा यांनी केले व डॉ. नरेंद्र लोहकरे यांनी आभार मानले. – जनसंपर्क विभाग, श्री. सरस्वती कराड हॉस्पिटल, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×