अफवांवर विश्वास ठेऊ नका; पुणे पोलिसांचे आवाहन

पुण्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

सोशल मीडियावर लहान मुलांचे अपहरणाच्या अफवा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – शहरात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा समाज माध्यमातून पसरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरात विशेषत : उपनगरात लहान मुलांना पळवून नेले जात आहे. परागावातील टोळी पुण्यात आली आहे, अशी अफवा समाज माध्यमातून प्रसारित केली जात आहे. अशा प्रकारचे संदेश प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे.

भिगवणमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण; डोळ्यात मिरची पूड फेकून अपहरण – सविस्तर बातमी 

नागरिकांना अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमात आढळून आल्यास विश्वास ठेऊ नका किंवा अशा प्रकारचे संदेश प्रसारित करु नका. समाज माध्यमात अशा प्रकारचे संदेश प्रसारित करणे टाळावे. संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्ष (११२) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. यापूर्वी शहरात अशा प्रकारच्या अफवा समाज माध्यमातील संदेशातून प्रसारित करण्यात आल्या होत्या. उपनगर, तसेच ग्रामीण भागात अशा प्रकारचे संदेश प्रसारित झाल्यानंतर घबराट उडाली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×