भिगवणमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण; डोळ्यात मिरची पूड फेकून अपहरण

भिगवणमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण; डोळ्यात मिरची फीड फेकून अपहरण

हिंदुत्ववादी संघटनांचे रास्ता रोको आंदोलन

marathinews24.com

पुणे – कुटुंबीयांसोबत खरेदीसाठी आलेल्या एका २१ वर्षे तरुणीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून भरदिवसा दोघांनी तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१७ ) दुपारी चारच्या सुमारास इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास पुणे- सोलापूर महामार्ग अडवून टायर जाळले आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा पोलीसांनी लावला छडा – सविस्तर बातमी 

झहीर हरून शेख आणि आयान हरून शेख (दोघे राहणार शेख वस्ती स्वामी चिंचोली तालुका दौंड जिल्हा पुणे) या सख्या भावांविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित तरुणी, तिची आई आणि भाऊ दुचाकीवरून भिगवन बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली. दोघांनी पीडित मुलीच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. काही मिनिटांमध्ये तिचे अपहरण केले. दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्यामुळे संतप्त नागरिकांसह हिंदुत्ववादी संघटनेने भिगवण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हिंदुत्ववादी संघटनेने महामार्ग रोखला.

पीडित २१ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा हे आंदोलन संतप्त झाल्याचे दिसून आले. त्यांनी पुणे सोलापूर महामार्ग अडवून टायर जाळत वाहन चालकांना अडथळा केला होता. मात्र पोलिसांनी संबंधित आंदोलकांना शांत करून त्यांना आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×