Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा पोलीसांनी लावला छडा

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

आरोपी विरोधात बलात्काराचा तर दुसऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या तक्रारी काही दिवसापूर्वी दाखल झाल्या होत्या. पोलीसांनी आरोपीचे मोबाईलचे लोकेशन तपासून दोन्ही प्रकरणाचा छडा लावला आहे. अल्पवयीन मुलीसह त्यांना पळवून नेणाऱ्या दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. एक मुलगी १४ वर्षाची तर दुसरी १७ वर्षाची आहे. प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या प्रकरणात अपहरणासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले.

आनंदनगरात घरफोडी, २१ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये २७ एप्रिल २०२५ रोजी १४ वर्षीय मुलीस पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास सुरू होता. पोलीसांनी सबंधीतांच्या मोबाईलचे लोकेशन तपासून प्रकरणाचा छडा लावला. मुलीसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी आरोपी विरोधात कलम ४, ८, १२ पोक्सो २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या एका प्रकरणात ३ मे २०२५ रोजी ग्रामीण पोलीसात तक्रार करण्यात आली होती. १७ वर्षीय मुलीस पळवून नेल्याचे नोंद झाली होती. याप्रकरणी पोलीसांनी छडा लावला. दोघांना ताब्यात घेतले. संबधीत आरोपी विरोधात कलम १३७ (२) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुलींची वैद्यकीय तपसणी करण्यासाठी सबंधीत विभागाकडे सुर्पूद करण्यात आले आहे. दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम दराडे, मुंडे, युवराज चव्हाण, बळीराम राठोड, संतोष जायभाये यांनी केला आहे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×