Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

डबल डेकर फ्लाय ओव्हरची तपासणी सात दिवसांत

डबल डेकर फ्लाय ओव्हरची तपासणी सात दिवसांत

पीएमआरडीए आयुक्तांचे आश्वासन

marathinews24.com

पुणे- शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पमध्ये संभाव्य स्ट्रक्चरल त्रुटी असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील सात दिवसांत मुख्य अभियंता प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी दिले. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी या संदर्भात चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा – सविस्तर बातमी 

पीएमआरडीएतर्फे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या डबल डेकर फ्लाय ओव्हर प्रकल्पातील बाणेर रॅम्पचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प मानला जातो. मात्र, रॅम्पच्या बांधकामातील एका भागाचे छायाचित्र समोर आल्यानंतर स्ट्रक्चरल जॉइंट नीट बंद न झाल्याची किंवा बांधकामाच्या गुणवत्तेत त्रुटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणाची तात्काळ तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निम्हण यांनी केली आहे.

बाह्य स्वरूपातील दोषामुळे तात्काळ संरचनेला धोका निर्माण होईल असे नसले तरी जॉइंटमध्ये त्रुटी असल्यास दीर्घकालीन टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात संबंधित ठिकाणाचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच आवश्यक असल्यास आयआयटी, व्हीजेटीआय किंवा अन्य मान्यताप्राप्त तज्ज्ञ संस्थेकडून तृतीय पक्ष तपासणी करण्याची मागणीही निम्हण यांनी केली आहे.

दरम्यान, नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांची निम्हण यांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले. या वेळी चौधरी यांनी पुढील सात दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करतील, असे आश्वासन दिले. तसेच आवश्यकतेनुसार आपण स्वतःही स्थळभेट देऊ, असेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×