डाॅ. खेवलकरांच्या निकटवर्तीयांनी पुरावे नष्ट केले

डाॅ. खेवलकरांच्या निकटवर्तीयांनी पुरावे नष्ट केले

पोलिसांकडून न्यायालयात ‘लेखी म्हणणे’ सादर

marathinews24.com

पुणे – खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी डाॅ. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाइलमधील महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. डाॅ. खेवलकर यांना जामीन दिल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करु शकतात, असे लेखी म्हणणे (से) पुणे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. पुरावे नष्ट केल्याप्रकरणात डाॅ. खेवलकरांचे निकटवर्तीय सामील असून, या प्रकरणात सखोल तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.

गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात जड वाहनांना नो एन्ट्री – सविस्तर बातमी 

डाॅ. खेवलकर यांनी न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला आहे. पुणे पाेलिसांनी त्यांच्या जामीन अर्जास विरोध केला आहे. याबाबत पोलिसांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) लेखी म्हणणे सादर केले. डाॅ. खेवलकरांचे दोन मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी एका मोबाइलमधील सीम कार्ड हे दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून या मोबाइलचा तांत्रिक तपास करण्यात आला. तेव्हा मूळ सीम कार्ड वापरकर्त्याने जळगावमधून नवीन सिमकार्ड मिळवले. हे नवीन सीमकार्ड नंतर दुसऱ्या मोबाइलमध्ये टाकून समाज माध्यमाचा वापर करण्यास सुरुवात केली.

समाज माध्यमातील महत्वाची माहिती खोडून टाकण्यात आल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आले आहे. आरोपींकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यात आणखी कलमे वाढवली जाणार आहे.आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रात म्हटले आहे. आरोपींनी तपासात अडथळा आणण्यासाठी मुद्दामाहून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×