Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला शोक

ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांची श्रद्धांजली

marathinews24.com

मुंबई – ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक तसेच इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ आणि मुक्तांगण या संस्थांचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘नीट’ प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी त्यांचा व्यक्तिगत परिचय होता. त्यांनी मानसोपचार, साहित्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून मानवी मनाचे विविध पैलू संवेदनशीलतेने समाजासमोर मांडले. “गद्धेपंचविशी”, “विषादयोग” यांसारख्या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते.

“त्यांच्या जाण्याने मनोविकारशास्त्र आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पश्चात पत्नी सविता आपटे, कुटुंबीय आणि असंख्य विद्यार्थी, वाचक व हितचिंतक असा मोठा परिवार आहे. या कठीण प्रसंगी आपण संपूर्ण परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत, ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×