Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कांदा दरघसरणीच्या पार्श्वभूमीवर पाशा पटेल समितीच्या शिफारशींबाबत डॉ. नीलम गोऱ्हेंची विधानपरिषदेत विचारणा

पायधुनीतील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या

कांदा दरघसरणीवर सरकारला धारेवर; पाशा पटेल समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी

marathinews24.com

मुंबई – राज्यातील कांदा दरघसरणीच्या प्रश्नावर विधानपरिषदेत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाशा पटेल समितीच्या शिफारशींबाबत सरकारकडे माहिती मागितली. मोठे प्रश्न निर्माण झाल्यानंतर विविध समित्या नेमल्या जातात. मात्र, त्या समित्यांच्या शिफारशींपैकी कोणत्या स्वीकारल्या आहेत, याबाबत त्यांनी सरकारची भूमिका जाणून घेतली.

वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंग परमात्म्याचीच सेवा – सविस्तर बातमी

यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थितीचा राज्यातील उद्योगांवर, विशेषतः चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्रांवर, काही परिणाम होण्याची शक्यता आहे का आणि त्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी विचारणाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.

यास उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी पाशा पटेल समितीचा अहवाल १६ ऑगस्ट रोजी प्राप्त होणार असून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. तसेच सध्या राज्यातील कृषी मालाला समाधानकारक भाव मिळत असून संभाव्य जागतिक घडामोडींचा त्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील कांदा दरघसरणीबाबत विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हे मुद्दे मांडले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×