Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचा अपघात, मोटारीचे टायर फुटले

स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

चालकाच्या प्रसंगवधानामुळे गंभीर अपघात टळला

marathinews24.com

पुणे – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मोटारीचे दोन टायर शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी परिसरात अचानक फुटले. धाराशिव येथील शासकीय मोटार चालकाच्या प्रसंगावधानामुळे गंभीर अपघात टळला. सुदैवाने या घटनेत डाॅ. गोऱ्हे यांच्यासह चालकाला दुखापत झाली नाही.

सागरी महोत्सव आणि जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा – सविस्तर बातमी

डाॅ. गाेऱ्हे सोलापूरकडून शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी पुण्याकडे निघाल्या होत्या. पावसामुळे टेंभुणी बाह्यवळण मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने शासकीय मोटारीचे टायर अचानक फुटले. मोटार चालकाने प्रसंगावधान राखून नियंत्रण मिळविल्याने गंभीर अपघात टळला. डाॅ. गोऱ्हे यांच्या मोटारीचा अपघात झाल्यानंतर याच परिसरात आणखी दोन वाहनांचे टायर फुटले. या घटनेची गंभीर दखल घेऊन डाॅ. गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना टेंभुर्णी बाह्यवळण मार्गावरील खड्डे त्वरीत बुजविण्याचे आदेश दिले. डाॅ. गोऱ्हे यांच्यासह चालकाला अपघातात दुखापत झाली नसल्याचे डाॅ. गोऱ्हे यांचे कार्यालयीन अधिकारी योगेश जाधव यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×