पुण्यात ड्रग्जचा साठा जप्त; राजस्थानातील दोघांना बेड्या

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील धानोरी परिसरात अंमली पदार्थांचा साठा ठेवून विक्रीसाठी तयारी करणाऱ्या राजस्थानातील दोघांना गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. आरोपींकडून मेफेड्रोन (एमडी) आणि डोडा चुरा असा अंमली पदार्थांसह 21 लाख 13 हजार 748 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित (वय 41) व राजूसिंह सहदेवसिंह राजपुरोहित (वय 42, दोघेही रा. राजस्‍थान) अशी अटक करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत.

“नीट पेपरफुटीप्रकरणी पुण्यात संताप; १९ मे रोजी आत्मदहन आंदोलनाचा इशारा – सविस्तर बातमी

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दि. 15 मे रोजी धनोरी येथील चक्रधर निवास, लेन क्रमांक एकमध्ये सिद्धार्थनगर परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी करणसिंह व राजूसिंह या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी मूळचे राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत. छाप्यात दोघांकडून 103 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी), 103 ग्रॅम डोडा चुरा, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण 21 लाख 13 हजार 748 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करत आहेत. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेझीतवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस अंमलदार राजस शेख, योगेश कुंभार, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, शरद धांडे, अमोल सोनवणे, संदीप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड तसेच महिला पोलिस अंमलदार सुकेशिनी आंबले, सुरेखा साबळे, आरती दिवेकर व वैशाली माकडी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×