फरासखाना पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – पुण्यात नशेची याबा गोळी, ७१८ गोळ्या जप्त – अंमली पदार्थ युक्त (याबा) गोळीची तस्करी करण्याच्या प्रयत्नातील आरोपीला फरासखाना पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार मोबाइल, दुचाकी, ७५ ग्रॅम वजनाच्या ७१८ नग (याबा) गोळ्या असा साडेसहा लाख रूपये किंमतीच्या जप्त केला. निशान हबीब मंडल ( वय ४७ रा. बँगलोर, कनार्टक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फरासखाना पोलीस १७ जुलैला हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व गजानन सोनुने यांना कर्नाटकातून याबा गोळ्यांची विक्री करणारा तस्कर बुधवार पेठेत येणार असल्याची माहिती मिळाली.
७५ व्या वर्षी कमाईची हाव सुटली; सायबर चोरट्यांनी ३७ लाखांना टोपी घातली – सविस्तर बातमी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पहाटे पाच वाजता आरोपी निशान मंडल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७१८ नग (याबा) नावाच्या गोळ्या. दुचाकी मोपेड, चार मोबाईल असा साडेसहा लाखांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी एपीआय शितल जाधव, उपनिरीक्षक अजित जाधव, कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, मोरे, गजानन सोनुने, नितीन जाधव, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, अकबर कुरणे, शशीकांत ननावरे, सुमित खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, संदिप लोंढे महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, रेखा राऊत, अर्चना ढवळे, भालेराव, बनसोड यांनी केली.