Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुणे विद्यापीठ चौकातील दुहेरी वाहतूक पूर्ववत

पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे रविवारी लोकार्पण

दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर वाहतूक वेगाने

marathinews24.com

पुणे – शहरातील गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रो मार्गिका, तसेच दुमजली उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर पाषाण, बाणेर, अभिमानश्री रस्त्यावरील एकेरी वाहतुकीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. या भागातील दुहेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून अभिनंदन – सविस्तर बातमी

मेट्रो मार्गिकेचे काम, तसेच दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाल्यानंतर विद्यापीठ चौकात वाहतूक बदल करण्यात आले होते. पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, अभिमानश्री सोसायटी रस्ता परिसरात दुहेरी वाहतूक रद्द करून तेथे एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. विद्यापीठ चौकातील काम पूर्ण झाल्यानतंर दुहेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे ’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.

विद्यापीठ चौक ते अभिमानश्री सोसायटी ते बाणेर रस्त्यावरील वाहतूक दुहेरी करण्यात आली आहे. पाषाणकडून अभिमानश्री सोसायटी ते विद्यापीठ चौक दरम्यानची वाहतूक दुहेरी करण्यात आली आहे. अभिमानश्री सोसायटीतून पाषाण आणि बाणेरकडे जाणारा रस्ता दुहेरी करण्यात आला आहे. बाणेर फाट्याकडून येणारी, तसेच अभिमानश्री सोसायटीतून पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांनी सकाळनगर परिसरातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×