वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – परिक्षेत डमी विद्यार्थ्याला बसवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघा विद्यार्थ्यांविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही परिक्षा नॉन टीचिंग पोस्टसाठी घेण्यात येत होती. अमोल कैलास जोनवाल आणि अर्जून जादुसिंग उर्फ कचरू भवरे (वय २६, रा. ता. बदनापूर, जि. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
ट्रकचालकाकडे लायसन्स नाही, अपघातानंतर थेट मालकावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील आर्मी पब्लिक स्कुलमध्ये नवोदया विद्यालय समिती, डायरेक्ट रिक्रुटमेंट ड्राईव्ह फॉर नॉन टीचिंग पोस्टसाठी परीक्षा घेण्यात येत होती. परीक्षेसाठी अमोल जोनवाल हा उमेदवार होता. मात्र, त्याने फसवणूकीच्या उद्देशाने अर्जून उर्फ कचरू याच्याशी संगनमत करून त्याला परीक्षेला बसवले. पर्यवेक्षकाच्या लक्षात येताच, सीबीएससी बोर्डाच्या नियमावलीनुसार आदेशाचा भंग करून बोर्डाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.