Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

प्राणी क्लेश रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक

marathinews24.com

पुणे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. प्राणी क्रूरतेच्या तक्रारींचे वेळेत व नियमानुसार निवारण करणे, तसेच प्राणी क्रूरतेच्या घटना कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा होऊन कार्यवाहीची दिशा निश्चित करण्यात आली. बैठकीला पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेशकुमार वासनिक, पशुसंवर्धन सहायक आयुक्त विष्णु गर्जे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष व मैत्री सेल कार्यान्वित – सविस्तर बातमी

पोलिस विभाग, महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांनी प्राणी कल्याणाच्या बाबींवर समन्वयाने कार्य करावे. प्राणी क्रूरता, गोवंश संरक्षण, कत्तलखाने व जनावरांची वाहतूक यासंदर्भातील तक्रारींवर निश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी, असे डॉ. वासनिक यांनी सांगितले. प्राण्यांना मारहाण करणे, काट्यांनी टोचणे, आजारी किंवा जखमी प्राण्यांवर उपचार न करणे, त्यांना बंदिस्त किंवा मर्यादित जागेत ठेवणे तसेच पुरेसे अन्न, पाणी व निवारा न देणे यास प्रतिबंध करावा. प्राण्यांशी मानवतेच्या दृष्टिकोनातून संवेदनशीलतेने वागावे, असे आवाहनही करण्यात आले.

भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आश्रय, निवारा व खाद्य देण्याच्या जागा निश्चित कराव्यात. निर्बिजीकरण, वैद्यकीय उपचार व अन्य आवश्यक सुविधांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. प्राणी क्लेश प्रतिबंधक संस्था अंतर्गत मागील वर्षापासून आतापर्यंत १३ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींचे संवेदनशीलतेने व वेळेत निवारण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

प्राणी क्रूरतेची प्रकरणे कमी करण्यासाठी यावर्षीचे उद्दिष्ट निश्चित करून व्यापक नियोजन करावे. सक्षम ग्रामपंचायती, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या माध्यमातून विकसित झालेल्या चांगल्या कार्यपद्धतींचे मॉडेल इतर तालुक्यांतही राबवावे. कत्तलखाने, जनावरांची वाहतूक आणि संबंधित विभागांतील समन्वयाबाबत नियोजनबद्ध कार्यवाही करून प्राणी कल्याणाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×